भडगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बंगलादेशातील शेख हसीना सरकार उलथून टाकल्यानंतर अंतरिम सरकारचे पंतप्रधान मुहम्मद युनूस यांनी हिंदू आणि गैर-मुस्लिमांवर कहर सुरू केला आहे. त्यामुळे येथील हिंदू बांधवांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केला जात आहे. या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविणाऱ्यांवर घेरून मारले जात आहे. बांगला देशात होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात १०डिसेंबर रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने भडगाव तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शितल सोलाट यांना देण्यात आले.
या आंदोलनात डॉ.निलेश पाटील, डॉ.प्रफुल्ल पाटील, सोमनाथ पाटिल, शाम मुसंडे, नाना हडपे, ॲड. निलेश तिवारी, ॲड. हेमंत कुलकर्णी, सचिन चोरडिया, प्रा.देवेंद्र मस्की, प्रा.सुरेश कोळी, रवींद्र पाटील, नरेंद्र पाटील, नितिन महाजन, सतीश वाजपेयी, सागर महाजन, मुन्ना परदेशी, अजय चौधरी आदींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
ढाका पोलिसांनी खोट्या प्रकरणात अटक केलेल्या चिन्मय कृष्ण दास प्रभूच्या सुटकेची मागणी हिंदूंनी लावून धरली आहे. हिंदूंवर होत असलेल्या जघन्य अपराधांचा आणि क्रौर्याचा निषेध केला. बांगलादेशातील मुहम्मद युनूस यांचे सरकार गैर-मुस्लिम, विशेषत हिंदूंना संरक्षण देत नाही. त्यांनी न्यायाची मागणी करणाऱ्या चिन्मय कृष्ण दास प्रभू यांच्यावर देशद्रोहाचा खोटा खटला चालवला आहे. आमची मंदिरे जाळली जात आहेत. आपल्या दैवतांच्या मूर्ती तोडल्या जात आहेत. हिंदूंना वेठीस धरले जात आहे, महिलांची इज्जत लुटली जात आहे, हिंदूंचे राजीनामे जबरदस्तीने घेतले जात आहेत. भारतात घुसलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांनाही हुसकावून लावावे, अशी आमची सरकारकडे मागणी आहे. युनूस सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेची हमी द्यावी, आम्ही भारत सरकारकडे हीच मागणी करतो तसेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग ही या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आज राष्ट्रीय मानव अधिकार आयोग दिवस असल्याने याबाबत आंदोलकांनी खंत व्यक्त केल्याचे पहायला मिळाले.