जळगाव (प्रतिनिधी) यंदा शेतकऱ्याचा पोरगा मैदानात आहे. तो शेतात राबलाय. शेतकऱ्याच्या घामाचं मोल त्याला माहित आहे. त्यामुळे यंदा सालदाराला नव्हे, तर शेतकऱ्याच्या पोरालाच आमदार बनवा, असे भावनिक आवाहन शिवसेनेचे माजी जिल्हा संघटक जळकेकर महाराज यांनी म्हसावद येथील सभेत केले.
म्हसावद येतील सभेत जळकेकर महाराज म्हणाले की, विधानसभा 2009 च्या निवडणुकीमध्ये सालदार मान्य नव्हता, म्हणून जनतेने त्याला पराभूत करत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना निवडून दिले. त्यांनतर 2014 मध्ये सहानभूती म्हणून पुन्हा सालदारावर लोकांनी विश्वास ठेवला आणि निवडून दिले. परंतू मतदार संघाची आता परिस्थिती आता अशी आहे की, सर्वसामान्य शेतकरी आणि जनता म्हणतेय ‘सालदार बदलणार आणि परिवर्तन घडविणार. या महाराज यांनी लाखोंच्या जनतेसमोर परिवर्तन करण्याची भीष्मप्रतिज्ञा करतो,असेही म्हटले. सालदाराने बळीराजाचा विश्वास घात केला आहे. या विश्वासघाताचा बदला म्हणून यंदा बळीराजाने ठरवले आहे की, यावेळी सालदाराकडून नव्हे तर,स्वत: ट्रॅक्टरने शेती कसणार आहे. त्यामुळे यंदा बळीराजा ‘सालदार बदलणार आणि परिवर्तन घडणारच’, असे प्रतिपादन जळकेकर महाराज यांनी ना. गुलाबराव पाटील यांचे नाव न घेता टीका केली आहे. या सभेला मोठा जनसमूदाय उपस्थित होता. एवढेच नव्हे, तर सभेस्थळी महाराजांचे भाषण सुरु असतांना तरुणांचा जल्लोष विरोधकांच्या मनात धडकी भरविणारा होता. अगदी याठिकाणची ही ऐतिहासिक सभा मानली जात आहे.
दरम्यान, आज अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांनी मोहाडी,सावखेडा, वावडदा, शिरसोली, म्हसावद आदी गावांमध्ये ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला. यावेळी गावातील महिलांनी चंद्रशेखर अत्तरदे व माधुरीताई अत्तरदे यांचे फुलहार घालून जागोजागी स्वागत केले. यावेळी भाजपा जळगाव तालुका अध्यक्ष संजय भोळे, शिरसोली-चिंचोरी गटातील शक्ति प्रमुख अनिल पाटील, बूथ प्रमुख रोहित पवार, बूथ प्रमुख पंकज तायडे, संजय सोनवणे, शक्ति प्रमुख चेतन सोनवणे, बूथ प्रमुख सचीन पाटील, भूषण पाटील, विशाल नन्नवरे, अनिल भागवत तसेच राकेश नन्नवरे (सरपंच, बांभोरी तथा तालुका सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा), निर्दोष पाटील (सरपंच, सोनवद) आणि आव्हाने गावचे सरपंच, ग्रा. प. सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.