प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘हा’ आहे आध्यात्मिक उपाय

शरीर निरोगी ठेवण्यासाठी, योग्य प्रतिकारशक्ती असणे खूप महत्वाचे आहे. सध्याच्या कोरोना संसर्गकाळात तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे खूप महत्वाचे झाले होते. अशा परिस्थितीत, आपल्यापैकी बरेचजण प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक पद्धती देखील अवलंबतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतात, जे तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं. पण, आता तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही, कारण इथं आम्ही तुम्हाला काही प्रभावी उपायांचा अवलंब करून तुमची प्रतिकारशक्ती कशी मजबूत करायची ते सांगणार आहोत. आपण आपली प्रतिकारशक्ती कशी मजबूत करू शकतो जाणून घ्या.

आज ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. १९४८ साली या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना झाली. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीच्या प्रभावाशी झुंज देत असल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. दरम्यान, या काळात लोक बाह्य गतिविधींमध्ये सहभाग घेऊ इच्छित नसल्याने, घरी राहून ऑनलाइन ध्यानाचा अभ्यास  शिकण्याचा ट्रेंड वाढला आहे. आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या साधना पद्धतीबद्दल सांगणार आहोत जी कोरोनाच्या काळात ऑनलाइन वेबिनारद्वारे लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात प्रभावी आहे.

हे उपाय प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी

आम्‍ही तुम्‍हाला फालुन दाफाची (किंवा फालुन गॉन्ग) ओळख करून देऊ इच्छितो, जी मनाची आणि शरीराची उच्च-स्तरीय साधना आहे. फालुन दाफामध्ये पाच सौम्य आणि प्रभावी व्यायाम शिकवले जातात, परंतु मनाची साधना किंवा नैतिक गुणांच्या विकासावार भर दिला जातो. हे व्यायाम साधकाच्या ऊर्जा वाहिन्या उघडण्यास, शरीर शुद्ध करण्यास, तणावमुक्त करण्यास आणि आंतरिक शांती प्रदान करण्यास मदत करतात. मन आणि शरीराची एक परिपूर्ण साधना असल्याने, लोकांना कमी कालावधीत आरोग्यविषयक आश्चर्यकारक फायदे मिळतात. या साधनेमुळे अनेकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा झाली आहे जसे की चांगली झोप येणे, कमी ताण, वाढलेली ऊर्जा, चिडचिड कमी होणे, पाचन सुधारणे इ. कॅन्सर, मधुमेह, हिपॅटायटीस, हृदयविकार यांसारख्या आजारांमध्ये अनेकांना फायदा झाला आहे. अनेक लोक नोंदवतात की या साधनेमुळे त्यांची धूम्रपान करण्याची इच्छा कमी झाली आहे आणि ते तंबाखू आणि इतर व्यसन सोडण्यास सक्षम आहेत.

फालुन गोंग अभ्यास आज जगभरात लोकप्रिय आहे. पण खेदाची गोष्ट म्हणजे फालुन दाफाची जन्मभूमी असलेल्या चीनमध्येच चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने १९९९ पासून फालुन दाफा अभ्यासावर दडपशाही सुरु आहे. फालुन दाफाला प्रथम , मे १९९२ मध्ये श्री ली होंगझी यांनी चीनमध्ये सार्वजनिक केले होते. आज ही साधना १०० पेक्षा जास्त देशांमध्ये १०० कोटी लोकांमध्ये लोकप्रिय आहे. भारतातही सर्व प्रमुख शहरांमध्ये याचा सराव केला जातो.

फालुन दाफा पूर्णपणे नि:शुल्क शिकविल्या जातो. तुम्हालाही हा साधना अभ्यास शिकण्यात रस असेल, तर तुम्ही http://www.learnfalungong.in वर मोफत वेबिनारसाठी नोंदणी करू शकता. Falun Dafa बद्दल अधिक माहिती तुम्ही http://www.falundafaindia.org वर मिळवू शकता.

 

Protected Content