नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। पुलवामा येथे भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या १२ दिवसांमध्येच भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. ही कारवाई करण्यापूर्वी गेल्या ११ दिवसात पडद्यामागे अशा वेगवान हालचाली घडल्या होत्या.
गेल्या 11 दिवसात काय घडले ? –
• १५ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेचे एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंह धनोआ यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी एअर स्ट्राइकचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला सरकारकडून तातडीने मंजुरी देण्यात आली.
• १६ ते २० फेब्रुवारी – यानंतर भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराने हेरॉन ड्रोनच्या आधारे नियंत्रण रेषेवर(एलओसी) टेहाळणी सुरू केली.
• २०-२२ फेब्रुवारी – या दरम्यान भारतीय वायुसेना आणि गुप्तचर संस्थांनी हल्ला (स्ट्राइक) करण्यासाठी संभाव्य ठिकाणं निश्चित केली.
• २१ फेब्रुवारी – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासमोर हल्ला (स्ट्राइक) करण्यासाठीच्या संभाव्य ठिकाणांबाबत माहिती देण्यात आली आणि हल्ला(स्ट्राइक) करण्यासाठीचं लक्ष निश्चित करण्यात आलं.
• २२ फेब्रुवारी – भारतीय वायुसेनेच्या 1 स्क्वाड्रन ‘टायगर्स’ आणि सात स्क्वाड्रन ‘बॅटल अॅक्सिस’ला हल्ल्याच्या मोहिमेसाठी ( स्ट्राइक मिशन) सज्ज करण्यात आली. याशिवाय मोहिमेसाठी दोन मिराज स्क्वाड्रनमधील १२ जेट निवडण्यात आले.
• २४ फेब्रुवारी – पंजाबच्या भटिंडा येथून वॉर्निंग जेट आणि उत्तर प्रदेशच्या आग्रा येथून विमानात हवेत इंधन भरण्याचा सराव करण्यात आला.
• २५ फेब्रुवारी – या दिवशी ऑपरेशन सुरू करण्यासाठी १२ मिराज विमानं तयार करण्यात आली. स्ट्राइक करण्याआधी मिराजच्या वैमानिकांनी लक्ष्य निश्चीत केलं. पाकिस्तानच्या मुजफ्फराबादमध्ये लेझर गाइडेड बॉम्बद्वारे (लक्ष्य अचूक साधणारे बॉम्ब) हल्ला करण्यात आला. रात्री ३.२० ते ४.०० वाजेदरम्यान ही कारवाई फत्ते करण्यात आली.
• २६ फेब्रुवारी – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोहीम फत्ते झाल्याबाबत माहिती दिली.