नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | निवडणूक आयोगाने १६ मार्च शनिवार रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या. बहूतेक पक्षांचे उमेदवार ही कित्येक मतदारसंघांमध्ये निश्चित झाले आहेत. अशातच मतदारांना आपल्या उमेदवाराची संपूर्ण माहिती असावी यासाठी निवडणूक आयोगाने एक ॲप आणले आहे.
नो युवर कँडिडेट असे या अॅपचे नाव आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवाराच्या पार्श्वभूमी व त्याची संपत्ती आणि या उमेदवारावर किती गुन्हे दाखल झाले आहेत किंवा तक्रारी दाखल आहेत याची माहिती या ॲप्पमध्ये दिली जाईल. आपल्या मतदारसंघातील उमेदवारांबाबत माहिती करून घेणे प्रत्येक मतदारांचा हक्क आहे. अशी माहिती निवडणूक आयूक्त राजीव कुमार यांनी दिली. यामध्ये मतदार आपल्या उमेदवारांचं नाव टाकून त्यांना सर्च करू शकतात.