तिसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार

Gulabrao Deokar Unmesh Patil

 

जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. देशात २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यात एकूण १४ राज्यातील एकूण ११५ मतदारसंघात मतदान होत आहे. त्यापैकी राज्यात १४ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात जिल्ह्यातील जळगाव व रावेरचा समावेश आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून तळपत्या उन्हातही प्रचाराने वेग घेतला होता. या प्रचाराची सांगता आज (रविवार) सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

 

जळगाव लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे गुलाबराव देवकर,भाजप-शिवसेना महायुतीचे आमदार उन्मेष पाटील यांच्यात लढत होत आहे. तर रावेर मतदार संघात भाजप-शिवसेना महायुतीच्या रक्षाताई खडसे विरुद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे डॉ.उल्हास पाटील यांच्यात लढत होत आहे. या दोन्ही मतदार संघात वंचित आघाडीने आपले उमेदवार उभे करून चुरस निर्माण केली आहे. काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मतदार संघात प्रचारसभा घेऊन वातावरण तापवले होते.

Add Comment

Protected Content