जळगाव प्रतिनिधी | कानडदा येथे जागतिक एड्स दिन या दिनानिमित्त आयोजित सामाजिक प्रबोधनाच्या कार्यक्रमास आल्या असतांना महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी विभाग नाशिक आयुक्त सदस्य शामिभा पाटील यांनी तृतीयपंथी भगिनींना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं.
त्या म्हणाल्या, “काही वर्षांपूर्वी एच.आय.व्ही.सारख्या आजाराविषयी समज गैरसमज होते. काळजी घेण्याच्या पद्धती, समाजामध्ये असलेले अपसमज त्यामध्ये आता खूप मोठाआणि सकारात्मक बदल होतोय. तृतीयपंथी समुदायाची प्रतिनिधी म्हणून सांगत असताना महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी माझ्या बहिणी राहतात. त्या भिक्षुकी व्यवसायासोबत जीवन व्यतीत करत आहेत. शारीरिक संबंध ही एक नैसर्गिक बाब आहे व त्याच्या पूर्ततेसाठी कुटूंबसत्ताक कुटुंब व्यवस्थेचा पर्याय नसल्यामुळे अज्ञान असेल, अनवधानाने झालेल्या चुकीमुळे किंवा नकळत भावनेतून झालेल्या कृत्यांमुळेदेखील गंभीर समस्येला सामोरं जावं लागतं. शरीर हे साधन असून ‘टाळी वरची पोळी’ ही आपल्या जगण्याची पद्धत असून टाळी वाजविण्यासाठीदेखील शरीर भक्कम असणं गरजेचं आहे. यासाठीची काळजी घायला हवी” असं त्यांनी सांगितलं.
जागतिक एड्स प्रतिबंधक दिनानिमित्त समुद्रातील सर्व भगिनींना आणि समाजातील इतर घटकांना एकमेकासोबत सुखाने आनंदाने जगण्यासाठी एकमेकाची काळजी घेऊया आणि संकल्प एच.आय.व्ही यापासून बचाव करण्यासाठी सुयोग्य साधनांचा वापर करण्याचा योग्य पद्धतीने प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प करूया असं आवाहन त्यांनी केलं.
फेसबुक व्हिडीओ लिंक :
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/891937244657219
युट्युब व्हिडीओ लिंक :