अपार्टमेंटमधील उघड्या घरातून दोन मोबाईल चोरट्यांनी लांबविले

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  शहरातील विशाल कॉलनीत असलेल्या नवसाचा गणपती मंदिराजवळ येथे एका अपार्टमेंटच्या उघड्या घरातून महागडे दोन मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. याबाबत शनिवार २२ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अनिकेत मनोज लोढा (वय-२७) रा. नवसाचा गणपती मंदीराजवळ, विशाल कॉलनी, जळगाव हा आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. शनिवार २२ ऑक्टोबर सकाळी ६.३० ते ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उघड्या घरात प्रवेश करून ३२ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेल्याचे समोर आले. दरम्यान अनिकेत लोढा यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांना मोबाईल कुठेही मिळून आला नाही. अखेर त्यांनी दुपारी १.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश निकम करीत आहे.

 

Protected Content