जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील स्वातंत्र्य चौकातील पानटपरीजवळून खासगी नोकरी करणाऱ्या तरूणाची अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वप्नील शिरीष येवले (वय-३१) रा. जीवन नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास स्वप्नील येवले हा त्याच्या दुचाकीने (एमएच १९ डीए ३७५८) ने स्वातंत्र्य चौकातील पानटपरीजवळ कामानिमित्ताने आले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी टपरीजवळ पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्याने २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्वप्नीलने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर मंगळवारी २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जुबेर तडवी करीत आहे.