जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट परिसरात हॉस्पिटलच्या कामासाठी आलेल्या तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, नारायण राजाराम पाटील (वय-४४) रा. रवंजा ता.जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १४ मे रोजी सकाळी ११ वाजता शहरातील गोलाणी मार्केटजवळील रूद्राक्ष मोबाईल रिपेअरींग दुकानासमोर दुचाकी (एमएच १९ एवाय २६०४) ने आले. दुचाकी पार्क करून ते डॉ. नरेंद्र जैन यांच्या दवाखान्यात कामानिमित्त गेले. त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्यांनी दुचाकीचा परिसरात शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर गुरूवार १९ मे रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस कर्मचारी करीत आहे.