जळगाव प्रतिनिधी । मैत्रिणीचा कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तरूणीचा मैत्रिणीच्या पतीने विनयभंग केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. याप्रकरणी रात्री उशीरा तरूणीच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, पिंप्राळा येथील सासर असलेल्या विवाहितेचा गेल्या तीन वर्षांपासून पतीसोबत कौटुंबिक वाद झाल्याने विवाहिता हाताश होवून सामाजिक कार्यकर्त्या तरूणी यांच्याकडे येवून कौटुंबिक वाद कथन केले. त्यानंतर मैत्रिणीला सोबत घेवून रविवारी २५ एप्रिल रोजी विवाहितेच्या घरी जावून विवाहितेला नांदविण्यास सांगितले. त्यावर विवाहिताचे पती राकेश राजेश गोटे यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना यांना अश्लिल शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तर विवाहितेची सासू भारती राजेश गोटे यांनी शिवीगाळ करून खोट्या गुन्हा दाखल करण्याचा दम दिला. विवाहितेसह सामाजिक कार्यकर्त्या यांनी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. विवाहितेच्या पतीसह सासू विरूध्द तक्रार दिली. दरम्यान, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुरूवातील तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर अदखपत्र म्हणून गुन्हा दाखल केला. सामाजिक कार्यकर्त्या रामानंद पोलीस ठाण्यात असतांना विवाहितेचे पती राकेश गोटेने पोलीस ठाण्याच्या आवारात येवून अश्लिल शिवीगाळ केली. रात्री उशीरा १ वाजता सामाजिक कार्यकर्त्या यांच्या फिर्यादीवरून अश्लिल शिवीगाळ व विनयभंग केल्याप्रकरणी राकेश गोटे आणि भारती गोटे या दोघांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.