सुनसगाव रोडवरील गोदामातून डिव्हीआरसह राऊटर चोरट्यांनी लांबविले

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सुनसगाव रोडवरील कामदार ट्रेड्सच्या गोडाऊनमधून चोरटय़ांनी डीव्हीआर तसेच राऊटर असा १ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवार २२ मार्च रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, सुनसगांव रोडवर कामदार ट्रेडर्सचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये असलेला डीव्हीआर तसेच राऊटर चोरून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास समोर आले.  याबाबत यश कमलाकर चौधरी (वय-२२) या कामदार ट्रेडर्सच्या तरुणाने नशिराबाद पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल अतुल महाजन हे करीत आहेत.

 

Protected Content