Home क्राईम चोरट्यांनी फोडले जिओ टॉवरचे जनरेटर, १७० लिटर डिझेलची चोरी

चोरट्यांनी फोडले जिओ टॉवरचे जनरेटर, १७० लिटर डिझेलची चोरी


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील तरसोद गावातील आसोदा रोडवर असलेल्या जिओ कंपनीच्या टॉवरमधील जनरेटरमधून सुमारे १७० लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत शनीवारी १४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनीकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील तरसोद शिवारातील आसोदा रोडवर जिओ कंपनीचे टॉवर आहे. १६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२:२० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या टॉवरच्या ठिकाणी प्रवेश केला. चोरट्यांनी जनरेटरचे नुकसान करून, त्यातील अंदाजे १५ हजार ६३४ रुपये किमतीचे १७० लिटर डिझेल चोरून नेले.

याप्रकरणी जिओ कंपनीचे सुपरवायझर विजय नागराज पाटील (वय ४९, रा. अथर्व कॉलनी, आशा बाबा नगर जवळ, जळगाव) यांनी नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेश मेंढे हे करीत आहे.


Protected Content

Play sound