Home क्राईम बसस्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; महिलेची सोन्याची मंगलपोत लांबविली

बसस्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; महिलेची सोन्याची मंगलपोत लांबविली

0
217


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरूवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याबाबत रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, मनिषा राजेंद्र पाटील वय ४० रा. बालाजी मढी, एरंडोल या महिला गुरूवारी १३ नोव्हेंबर रोजी जळगाव शहरात कामानिमित्त आलेल्या होत्या. दुपारी ३ वाजता जळगावातील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगलपोत चोरून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर महिलेने सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीली तपास पोलीस नाईक कमलेश पवार हे करीत आहे.


Protected Content

Play sound