Home क्राईम भुसावळात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून पावणे दोन लाखांचा ऐवज लांबविला

भुसावळात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून पावणे दोन लाखांचा ऐवज लांबविला


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या ३२ खोली, डायमंड पार्क परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख इस्ताक शेख मोहम्मद (वय ४०, रा. भुसावळ) हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. ३१ मार्च ते १ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी शेख इस्ताक यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर शिताफीने फोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

चोरट्यांनी घरात ३० हजारांची सोन्याची अंगठी, १० हजारांचे चांदीचे पैंजण, १ लाख ७० हजारांची रोकड असा एकुण २ लाख १० हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार समोर आल्यानंतर शेख इस्ताक यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख हे करीत आहे.


Protected Content

Play sound