Home क्राईम बुलेटची चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !

बुलेटची चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चारचाकीतून आलेल्या चोरट्यांनी नेहरु नगरातील शोभा अपार्टमेंटमधील भारत वासुदेव बेंडाळे (वय ५३) यांची बुलेट चोरुन नेली. ही घटना शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास घडली. दुचाकीची चोरी करणारे चोरटा नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी शनिवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील नेहरु नगरात भारत बेंडाळे हे रात असून त्यांचा कन्सट्रक्शन मटेरिअल पुरविण्याचा व्यवसास आहे. शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी ते मध्यरात्रीच्या सुमारास मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमाहून घरी परतले. सकाळी ६ वाजता ते मॉर्निंग वॉकसाठी निघाले असता, त्यांना घराखाली लावलेली (एमएच १९, डीआर ७१११) क्रमांकाची बुलेट दिसून आली नाही. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली, यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे एका कारमधून त्याठिकाणी आले, त्यातील एक जण खाली उतरून त्याने ढकलून नेत बुलेट चोरुन नेतांना कैद झाला आहे. ते फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी शनिवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound