जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात येवून चोरीच्या दुचाकींची चोरी करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील चोरट्यांला दोन दुचाकींसह आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, औरंगाबाद जिल्ह्यातील दुचाकी चोरटा जळगाव जिल्ह्यात येवून दुचाकींची चोरी करून औरंगाबाद जिल्ह्यात घेवून जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने संशयित आरोपी अतुल संजय इंगळे (वय-२५) रा. गलवाडे ता. सोयगाव जि.जळगाव याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्यांने चोरीच्या दोन दुचाक्या काढून दिल्या. दोन्ही दुचाकी ह्या जामनेर तालुक्यातून अटक केल्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रदीप पाटील, सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, विजय पाटील, पंकज शिंदे आदींनी कारवाई केली.