मुक्ताईनगरात सुरू असलेले खासगी क्लासेस बंद करा; खासगी शिक्षक संघटनेची मागणी

मुक्ताईनगर प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव असतांना शहरात ऑफलाईन क्लासेस सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी खाजगी शिक्षक संघटनाचे तहसीलदार निवेदन देवून केली आहे. 

याबाबत अधिक वृत्त असे की, शासनाने ऑफलाइन क्लासेस सुरू करण्यास परवानगी दिली नसतानासुद्धा मुक्ताईनगर शहरात अनेक ठिकाणी सर्रासपणे ऑफलाईन शिकवणी वर्ग सुरू आहेत प्रशासनाचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. मुक्ताईनगर शहरात खाजगी शाळेतील शिक्षक सुद्धा लहान मुलांना घरी बोलावून सर्रासपणे क्लासेस घेत आहे. यामुळे कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव वाढू शकतो आपणास आम्हा सर्वांचे अशी विनंती की, प्रशासनाने तात्काळ दोन दिवसात शहरातील सदर ऑफलाइन पद्धतीने सुरू असलेल्या क्लासेस बंद करावे.  ज्या घरमालकाच्या घरांमध्ये सर्रासपणे सदरहू ऑफलाइन क्लासेस सुरू असतील त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करावे. अर्ज मिळाल्यापासून 2 दिवसात जर सदर ऑफलाइन क्लासेसवर कारवाई न झाल्यास सदर क्लासेस सुरू राहिल्यास आम्ही सुद्धा सर्व खाजगी संघटनेचे संचालक क्लासेस सुरू करू करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

 

निवेदन देतांना ॲड. नरेंद्र सापधरे (स्वप्नपूर्ती क्लासेस), चंद्रशेखर कुलकर्णी (गजानन क्लासेस) प्राध्यापक योगेश  राणे (मुक्ताई क्लासेस )प्राध्यापक अविनाश नाईक  मुकताई क्लासेस ,प्राध्यापक निलेश सावळे सर (इन्फिनिटी क्लासेस)प्राध्यापक श्वेता जैन(निर्मल तारा क्लासेस )प्राध्यापक जयश्री कुलकर्णी (अथर्व संस्कृत क्लासेस) प्राध्यापक मंगेश नीले (समर्थ क्लासेस) या खाजगी क्लासेसचे शिक्षक उपस्थित होते.

Protected Content