यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथील राहणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाने तब्बल ११ दुचाकींपेक्षा जास्त जळगाव शहरासह ग्रामीण भागातून चोरी करून सावखेडा सिम दहिगाव भागात कमी दरात विक्री केल्याप्रकरणी जळगाव पोलिसांनी त्यास अटक केली आहे. पोलिसांनी संशयीतास ताब्यात घेत चौकशीत त्यांच्याकडून चोरीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आले आहे., आसिफ बशीर पटेल वय ३७ रा. दहिगाव ता.यावल असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
यावल तालुक्यातील दहिगावातील पटेल वाड्यात रहिवास करीत असलेला आसिफ बशीर पटेल यास ४ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेची सुमारास ताब्यात घेऊन चौकशी केली चौकशी अंती त्याने चोरून आणलेल्या मोटारसायकली ज्या ज्या लोकांना कमी दरात विक्री केलेले आहेत त्यांची नावे त्याने पोलिसांना सांगितले. वरून पोलिसांनी त्वरित त्या लोकांच्या घरून मोटारसायकली ताब्यात घेतल्या ४ डिसेंबर रोजी ६ मोटारसायकली तर ५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ५ मोटारसायकली ताब्यात घेतल्या अशा एकूण ११ मोटर सायकल हस्तगत करुन जळगाव पोलिसांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनला जमा केलेले आहेत.
आरोपी आसिफ हा गेल्या पाच ते सहा महिन्यापासून मोटार सायकली जळगाव भागातून चोरून दहिगाव व सावखेडा सिम व ग्रामीण भागात विक्री करीत होता. चांगल्या परिस्थितीत असलेली मोटार सायकल ८ ते १० हजार जास्तीत जास्त १५ हजारापर्यंत विक्री करीत होता. हे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याचप्रमाणे ज्यांनी मोटरसायकली ताब्यात दिल्यात त्यांनी सुद्धा पोलिसांना याबाबतची माहिती दिली या कामी जळगाव शहर पोलीस ठाण्याचे फौजदार राजू जाधव पोलीस स्टेशन कॉन्स्टेबल सतीश पाटील, उमेश भांडारकर, राहुल पांचाळ, अमोल ठाकूर हे तपास करीत आहेत या प्रकरणात आणखी काही मोटारसायकली मिळतील असा विश्वास पोलिसांनी यावेळी व्यक्त केला आहे जळगाव पोलिसात आरोपी आसिफ पटेल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.