भुसावळ प्रतिनिधी । घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असणार्या आरोपीच्या मुसक्या आज बाजारपेठ पोलस स्थानकाच्या पथकाने मध्यप्रदेशात जाऊन आवळल्या आहेत.
याबाबत वृत्त असे की, राहूलकुमार उर्फ मच्छी पूनमचंद चदेवा (कहार) (रा. खिरकिया, जिल्हा हरदा, मध्यप्रदेश) या फरार आरोपीच्या मागावर पोलीस होते. त्याच्या विरूध्द भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात भाग ५ गुरंन २०७/२०१५ भा द वि कलम- ४५४, ४५७, ३८० अन्वये तसेच भाग ५ गुरन ०३/२०१६ भा द वि कलम-४५४,४५७, ३८० असे गुन्हे दाखल असून तो फरार होता. हा आरोपी खिरकिया परिसरात आल्याची गुप्त माहिती कॉन्स्टेबल विकास सातदिवे यांना मिळाली होती. या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड व पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने मध्यप्रदेशातील खिरकिया येथे जाऊन फरार आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला भुसावळ येथे आणले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड तसेच पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनखाली पो.ना. रमण सुरळकर, कॉन्स्टेबल विकास सातदिवे व ईश्वर भालेराव यांच्या पथकाने पार पाडली.