मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची कोल्हापूर, सातारा किंवा अन्य ठिकाणी देखील ज्या गाद्या आहेत. जे राज्य त्यांनी निर्माण केले आहे. त्या गाद्यांविषयी आम्ही सदैव आदर राखलेला आहे. छत्रपतींच्या गादीसमोर नतमस्तक होणे हे प्रत्येक हिंदू व मराठी माणसाचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजासंदर्भातील आपले अंतरंग तपासून पहावे, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपाच्या टीकेचा समाचार घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वाचे दैवत आहे. शिवसेनेने सदैव छत्रपती शिवाजी महारांजासमोर नतमस्तक होण्याचे कर्तव्य बजावलेले आहे. महाराष्ट्राची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज हीच आहे. तेव्हा आम्हाला कोणी छत्रपती शिवाजी महाराज या संदर्भात ज्ञान देण्याची गरज नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. छत्रपतींच्या प्रत्येक गादी विषयी आम्हाला आदर आहे. परंतु, छत्रपती उदयनराजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला, हा शिवरायाच्या वंशजांचा अपमान आहे.त्या बद्दल भाजपा शिवरायांच्या वंशजांची व महाराष्ट्राची माफी मागेल काय? असेही संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.