Home क्राईम बंद घर फोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांचा ऐवज लांबविला !

बंद घर फोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांचा ऐवज लांबविला !

0
138


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील संभाजी नगरात एकाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण ६७ हजार रूपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरून नेल्याची घटना सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विलास दत्तात्रय सैतवाल वय ५६ रा. संभाजी नगर, जळगाव हे वास्तव्याला आहेत. सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विलास सैतवाल यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड हे करीत आहे.


Protected Content

Play sound