जळगाव, प्रतिनिधी । मनपा मार्फत आयोजित थर्मल स्क्रिनिंग अभियान अंतर्गत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव शाखेच्या कार्यकर्त्यांनी आज पाचव्या दिवशी थर्मल स्क्रिनिंग अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत गणेश कॉलनी परिसरातील २१८ कुटुंबातील ८१७ नागरिकांची थर्मल स्क्रिनिंग केली.
मागील पाच दिवसांपासून सातत्याने जळगाव शहरातील वार्ड क्र. ६ व ७ मधील टागोर नगर, पोलीस कॉलनी, विवेकानंद नगर, गणेश वाडी जयकीसन वाडी, आंबेडकर मार्केट परिसर, जानकी नगर, तुकाराम वाडी व गणेश कॉलनी परिसरातील एकूण १२७८ कुटुंबातील ५११८ नागरिकांची पीपीई किट घालून थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली व आर्सेनिक अल्बम गोळ्यांच वाटप अभाविप कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले. आज थर्मल स्क्रिनिंग अभियानात अभाविप जळगाव विभाग प्रमुख प्रा.डॉ. मनिष जोशी, अभाविप प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे, महानगरमंत्री रितेश चौधरी, हर्षल तांबट, आदेश पाटील, पवन भोई, मानस शर्मा, पवन भोळे, विलास पाटील, श्रीकांत पवार, आकाश धनगर, शुभम सोनार, सागर बाविस्कर या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.