जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात यंदा बी-बियाणे, खतांची कोणतीही कमतरता भासणार नाही, २७ लाखापेक्षा अधिक पाकिटे बियाणे जिल्ह्यात येतील. जिल्ह्यात १ लाख ३३ हजार ४८२ मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध आहेत अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.
यावेळी संभाजी ठाकूर यांनी सांगितले की, पूर्वी मे महिन्यातच अनेक बागायतदार कपाशीची पेरणी करत होते. मात्र गेल्या काही वर्षापासून गुलाबी बोंड अळीच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना बियाणे मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळेल. यामुळे बागायतदारांची पंचाईत झाली आहे. तरीही बियाणे येईल तेव्हा पेरणार आहे. आतातर शेत पेरणी योग्य करण्याच्या उद्देशाने शेतातील काडीकचरा वेचणे, धस, पळकाट्या जाळणे, बांधावरील तण काढणे, अशी कामे सुरू करीत आहेत. शेत स्वच्छ करून पेरणी योग्य करण्याच्या कामास वेग आला आहे.
जिल्ह्यात २०२२ – २३ या वर्षात मनरेगाअंतर्गत ३३० एकर तर इतर योजनेअंतर्गत १३० अशा एकूण ४६० एकरात तुतीची म्हणजे रेशीमची लागवड होणार आहे. यासाठी २ कोटी ३७ लाख खर्च येणार आहे. यातून १६ हजार ८८० क्विंटल कोष उत्पादनाचा अंदाज असून उत्पादन सुमारे ८० कोटी रूपयांचे अपेक्षित आहे, अशी माहिती देखील संभाजी ठाकूर यांनी दिली आहे.