Home राजकीय राजीनामा दिलेला नाही-विखे-पाटील

राजीनामा दिलेला नाही-विखे-पाटील


VikhePatil

 

 

अहमदनगर (वृत्तसंस्था) विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त राधाकृष्ण विखे पाटील यांनी फेटाळलं आहे. आपण विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही, असं विखे-पाटील यांनी सांगितले आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत होतं. त्यांचा पुत्र सुजय याने भाजपात प्रवेश केल्यापासूनच त्यांच्या कॉंगेसमधील वाटचालीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. आधी राजीनामा दिल्याचे वृत्त आणि नंतर खंडन केल्याचे वृत्त आल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत सस्पेन्स कायम आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound