मुंबई (वृत्तसंस्था) भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरला नसल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे थोड्याच वेळापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या वेळीस विधानसभेचा फॉर्म्युला ठरला असल्याचे म्हटले होते.
भाजपाची निवडणूक समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी १०० टक्के युती होईल, मात्र युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही असे सांगितले आहे. तसेच युतीचा निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. युतीची घोषणा कधी होणार याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, युतीची घोषणा कधी होणार याचे उत्तर देण्यासाठी ‘लवकरात लवकर’ हाच शब्द योग्य ठरेल. अनिल देसाई काय बोललात हे मी ऐकले नाही. त्यांच्याशी बोलून घेतो. नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत शिवसेनेला विश्वासात घेऊन मुख्यमंत्री निर्णय घेतील असेही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.