नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तुम्ही न्यायलयीन प्रक्रिया सुरु होण्याआधीच गोळी चालवणार असाल, तर मग न्यायालय, कायदा आणि पोलीस असण्याचा अर्थ काय,अशा शब्दात माजी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी हैदराबाद पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.
मनेका गांधी यांनी चकमकीवर बोलताना सांगितले आहे की, जे झाले आहे ते देशासाठी अत्यंत भयानक आहे. तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही. न्यायालयाने त्यांना अशीही फाशीची शिक्षा सुनावली असती. तर तुम्ही न्यायलयीन प्रक्रिया सुरु होण्याआधीच गोळी चालवणार असाल, तर मग न्यायालय, कायदा आणि पोलीस असण्याचा अर्थ काय?, केवळ तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही एखाद्याला कसं मारू शकता?, जे झाले ते खूप भयानक, अशा शब्दात मनेका गांधी यांनी हैदराबाद पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.