मुंबई प्रतिनिधी | राज्य सरकारने घटनेचा अवमान केला असून यामुळे राज्यात राष्ट्रपती लागवट लागू शकते असा दावा आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
आ. चंद्रकांत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, नियमांमध्ये बदल करुन आता त्यांच्याकडे तारीख मागितली जात आहे. यापूर्वी घटनेप्रमाणे त्यांनी दोनदा तारीख दिली तुम्ही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतली नाही. राज्यपालांनी दिलेल्या तारखेला ती निवडणूक न घेणं हा राज्यपालांचा आणि पर्यायानं घटनेचा अवमान असतो. घटनेचा अवमान केल्याच्या मुद्द्यावरही राष्ट्रपती राजवट लागू शकते, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान विधानसभा अध्यक्षपद निवडीचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीने महाविकास आघाडीच्या तीन मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी राज्यपालांकडे सुपूर्द केला. मात्र यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कायदेशीर सल्ला घेणार आहेत.