जळगाव प्रतिनिधी । मु.जे.महाविद्यालयाच्या समोर दुकानासमोर पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, गौरव पांडुरंग चौधरी (वय-२५) रा. चौधरी वाडा, ममुराबाद ता.जि.जळगाव ह.मु. विद्यानगर खेडी शिवार जळगाव हे किरकोळ वस्तूचे विक्री करण्याचे काम करतात. ३ मे रोजी १२.१५ वाजेच्या सुमारास गौरव चौधरी हे दुचाकी (एमएच १२ एचटी २४९४) क्रमांकाच्या दुचाकीने शहरातील मु.जे.महाविद्यालयासमोरील साईप्रसाद स्टेशनरी दुकानावर आले, त्यांनी मोटासायकल दुकानाच्या समोर पार्किंगल करून लावली व मित्रासह सिध्दीविनायक नगरात कामानिमित्त निघून गेले. २० मिनिटानंतर परत दुचाकीजवळ आला असता. दुचाकी जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध करून दुचाकी न आढळल्याने रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले, गौरव चौधरी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद सोनवणे करीत आहे.