जळगावातून तीन ठिकाणाहून दुचाकींची चोरी; वेगवेगळे तीन गुन्हे दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वेगवेगळ्या तीन ठिकाणाहून दुचाकी चोरी झाल्याचे समोर आले आहे. यात नवजीवन सुपर शॉप, आडवाणी पॉली प्रॉडक्ट कंपनीच्या कम्पाऊंडमधून आणि अयोध्या नगर परिसर अश्या तीन ठिकाणाहून तीन दुचाकींची चोरी झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पहिली घटना : जफर जाकीर हुसेन खाटीक वय ३० रा. मेहरूण जळगाव हा तरूण कुटुंबासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. बुधवार ९ ऑक्टोबर रोजी जफर खाटीक हा दुचाकी क्रमांक एमएच १९ डीपी ३५०३ ने जळगाव शहरातील नवजीवन सुपर शॉप दुकानाजवळ आला आणि तिथेच त्याने दुचाकी पार्क करून लावली. दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली. ही घटना सायंकाळी साडेसात वाजता समोर आली. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरूवारी १० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनिल पाटील हे करीत आहे.

दुसरी घटना : अमीत मनोज कुमार आडवाणी वय ३१ रा. आदर्शन नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे एमआयडीसीत आडवाणी पॉली प्रॉडक्ट नावाची कंपनी आहे. १४ सप्टेंबर रात्री ८ वाजता दुचाकी क्रमांक एमएच १९ सीएस १४१८ ने कंपनी आले. त्यावेळी त्यांनी दुचाकी कंपनीच्या कम्पाऊंडमध्ये पार्कींग करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. ही घटना दुसऱ्या दिवशी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता उघडकीला आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी गुरूवारी १० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील हे करीत आहे.

तिसरी घटना : जळगाव शहरातील अयोध्या नगरात जितेंद्र संजय वारूळे वय ३१ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. भाजीपाला विक्री करून तो आपला उदरनिर्वाह करतो. त्यांनी त्यांची दुचाकी क्रमांक एमएच १९ सीएल ९१७७ ही घरासमोर पाकींगला लावलेली असतांना अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता समोर आली आहे. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी गुरूवारी १० ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे हे करीत आहे.

Protected Content