जळगाव प्रतिनिधी । गणपती मूर्ती घेण्यासाठी आलेल्या तरुणाची मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार २२ ऑगस्ट रोजी एमआयडीसी परिसरातील हॉटेल नीलांबरी समोर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, मंगल पुंडलिक पाटील (वय ५४, रा.श्रीराम समर्थ कॉलनी, पिंपळा, जळगाव) हे गणपती घेण्यासाठी मुलगा सेजस पाटील यांच्यासह मोटरसायकल क्रमांक (एमएच १९ बीएक्स ७९२) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील तोल काटा जवळील हॉटेल निलांबरीजवळ आले दुचाकी पार्किंग करून गणपती घेण्यासाठी गेले.
गणपती घेऊन ६.३० वाजेच्या सुमारास पुन्हा पार्किंग लावलेल्या दुचाकीजवळ आले असता दुचाकी मिळून आली नाही, इतरत्र शोधाशोध केली असता न मिळाल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महेंद्रसिंग पाटील करीत आहे.