Home क्राईम भादली येथून दुचाकीची चोरी; चोरट्यांविरोधात गुन्हा

भादली येथून दुचाकीची चोरी; चोरट्यांविरोधात गुन्हा

0
24


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भादली गावातून अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी लंपास केल्याची घटना घडली असून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.   

अधिक माहिती अशी की,  धीरज ज्ञानेश्वर पाटील (वय-२४) रा. भादली ता.जि.जळगाव  हे मेडीकलचे काम करतात. तालुक्यातील भादली येथून जळगावला ये-जा करण्यासाठी (एमएच १९ एएम ३३४८) क्रमांकाची दुचाकी आहे. १९ ऑक्टोबर रोजी त्यांनी घरासमोर दुचाकी लावली होती. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुचाकी आढळून आली नाही. दुचाकीची इतरत्र शोधाशोध केली असता मिळून आली नाही. धीरज पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अरूण राठोड करीत आहे.

 

 

 


Protected Content

Play sound