एरंडोल येथे काँग्रेसतर्फे स्वाक्षरी मोहीम

एरंडोल प्रतिनिधी । तालुका काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र शासनाने शेतकरी विरोधात केलेल्या कायद्याच्या विरोधात आज शेतकऱ्यांची स्वाक्षरी मोहीम सुरु केली.

सदर मोहिमेचे उद्घाटन तालुका काँग्रेस निरिक्षक सचिन सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजय महाजन,शहराध्यक्ष संजय भदाने, प्रा. आर.एस.पाटील,इम्रान सैयद,अनिल कलाल,सुरेश पाटील, राकेश चौधरी आदी उपस्थित होते.

सह्या घेण्यात येणाऱ्या निवेदनात केंद्रातील भाजप सरकारने नुकतेच काळे कायदे पास केले आहे.यामुळे शेतकरी, शेतमजुर,हमाल व बाजार समित्यांचे नुकसान होणार असल्याचे म्हटले आहे.केंद्र सरकार कृषी मालही देशातील मोठ्या भांडवल दारांच्या दावणीला बांधत आहे व त्यांनी सर्वच उद्योग विक्रीला काढले असल्याचे म्हटले आहे.तसेच यासाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने पुढाकार घेतला असल्याचे म्हटले आहे व त्यासाठी महाराष्ट्रातून राष्ट्रपतींना दोन कोटी सह्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

त्यासाठी आज दि.२० ऑक्टोबर पासुन एरंडोल तालुक्यातून सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहिमेस शिवसेना तालुकाध्यक्ष वासुदेव पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील,माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, रविंद्र चौधरी,राष्ट्रवादी काँग्रेसचे  अमित पाटील,जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी राजेंद्र शिंदे,शालिग्राम गायकवाड,सुनिल पाटील बाम्हणे, मदन भावसार,शेतकी संघ अध्यक्ष नवल अप्पा पाटील,प्रकाश ठाकुर,पांडुरंग बाविस्कर निपाने,शेख सांडू आदींनी सह्यांच्या ठिकाणी भेटी दिल्या.एरंडोल विधानसभा मतदार संघातून दहा हजार शेतकरी व शेतमजूर यांच्या सह्या घेण्यात येणार असुन आज दिवस अखेर ७०० शेतकरी व शेतमजूर यांच्या सह्या घेण्यात आल्या असल्याचे व हा उपक्रम संपुर्ण मतदार संघात राबविण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष विजय महाजन यांनी सांगितले.

 

Protected Content