जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवरील हॉटेल मुरली मनोहर समोरील मोकळ्या जागेत लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी ३ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विजय सुरेशसिंग राजपूत वय ४२ रा ममुराबाद रोड, सिकवाल नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ३ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता विजय राजपूत हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएस ३४२५) ने जळगाव शहराती अजिंठा चौफुलवरील हॉटेल मुरली मनोहर येथे आलेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी ही पार्क करून लावली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.
त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहे.