Home क्राईम पिठाच्या गिरणीतून दोन ईलक्ट्रीक मोटारींची चोरी

पिठाच्या गिरणीतून दोन ईलक्ट्रीक मोटारींची चोरी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गेंदालाल मिल परिसरात पिठाच्या गिरणीतून दोन इलेक्ट्रीक मोटारी चोरुन नेल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शनिपेठ परिसरात गोपाल भवरलाल वैष्णव हे वास्तव्यास असून ते खासगी वायरमन व पिठाची गिरणी चालवून कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. शहरातील गेंदालाल मिल परिसरात त्यांची पिठाची गिरणी असून दि. २७ रोजी सायंकाळच्या सुमारास पाऊस सुरु झाल्याने लाईट गेली. बराचवेळ झाला तरी लाईट न आल्यामुळे वैष्णव हे घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी दिवसभर लाईट फिटींगचे काम करुन गोपाल वैष्णव हे घरी गिरणीवर आले. यावेळी त्यांना गिरणीत लावलेल्या दोेन इलेट्रीक मोटार दिसून आल्या नाही. त्यामुळे त्यांना गिरणीत चोरी झाल्याची खात्री झाली. त्यानंतर गोपाल वैष्णव यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound