रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील अहीरावाडी येथून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन म्हशी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. वारंवार होत असलेल्या गुरांच्या चोऱ्यांमुळे शेतकरी हैराण झाले आहे. याप्रकरणी अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील आहीरवाडी येथील शेतकरी तुळशीराम धनगर यांच्या मालकीच्या दोन म्हैशी गोठ्यात ७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता बांधलेल्या होत्या. मध्यरात्री रात्री अज्ञात चोरट्यांनी गोठ्यातून १ लाख ७५ हजार रूपये किंमतीच्या दोन म्हैशी चोरुन नेल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली. चोरीची माहिती मिळताच भाजपा पदाधिकारी संदीप सावळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याप्रकरणी अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.