गुरांचा बाजार मार्केट परिसरातून छोटा हत्ती वाहनाची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील गुरांचा बाजार एका दुकानासमोर उभे मालवाहू वाहन चोरट्यांनी लांबविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील प्रविण संजय बैतुले हे एमआयडीसीतील गुरांचा बाजार परिसरात राहतात. ते चालक आहे. त्यांनी ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांच्याकडे असलेले एम.एच. २० सीटी ४४६४ या क्रमाकांचे मालवाहू वाहन गुरांचा बाजार परिसरातच आर्टीकल या दुकानासमोर उभे केले होते. हे वाहन चोरुन नेल्याचा प्रकार समोर दुसऱ्या दिवशी समोर आला. चालक प्रविण बैतुले यांनी वाहनाचा सर्वत्र शोध घेतला मात्र वाहनाबदृदल कुठलीही माहिती अथवा वाहन मिळून आले नाही. अखेर सोमवारी प्रविण बैतुले यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात ८० हजार रुपयाचे मालवाहू चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहेत.

Protected Content