बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड तालुक्यात बकऱ्यांच्या चोरीची घटना घडली आहे. तालुक्यातील शिरसाळा येथे दि. २४ ऑक्टोबर रोजी वेळ रात्री १:०० ते ३:०० वाजेदरम्यान शिरसाळा रुईखेडा रस्त्यावर असलेल्या वाड्यातून पाच बकऱ्या व एक बोकड असे एकूण सहा जनावरे चोरीला गेली. या जनावराची एकूण किंमत 50 ते 60 हजार होती.
बकऱ्या या ग्रामपंचायत सदस्य दरबार सिंग रायसिंग पारधी या व्यक्तीच्या मालकीच्या होत्या. बकऱ्या चोरीस गेल्याचे पाच वाजेच्या सुमारास लक्षात आल्यावर त्यांनी बकऱ्यांची शोधा शोधा सुरू केली व या विषयाची चर्चा गावात सर्वीकडे पसरली. ग्रामीण भागात गुरेढोरा चोरण्याचे टोळी सक्रिय झाल्याने ग्रामीण परिसरात पशुपालकांनी सावध राहावे अशी आवाहन करण्यात आले आहे.