अट्रावल येथील जिल्हा परिषद शाळेतून शालेय पोषण आहाराची चोरी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अट्रावल येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी फोडून शालेय पोषण आहाराचा तांदूळ, हरभरा व मुगदाळ चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील अट्रावल येथील जिल्हा परिषद शाळा कोरोनामुळे बंद आहेत. शाळेच्या कार्यालयात फक्त शिक्षक वर्ग यांची उपस्थिती असते. १४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता सर्व शिक्षक शाळेला कुलूप लावून घरी निघून गेले होते. गुरूवारी १५ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता शिक्षक वर्ग शाळेत आले असता त्यांनी शाळेच्या कार्यालयाचे कडीकोयंडा तोडलेला दिसून आला. आता जावून पाहणी केली असता कार्यालयात ठेवलेले विद्यार्थ्यासाठीचे शालेय पोषण आहाराचे तांदूळ, हरभरा आणि मुगदाळ असा एकुण ३४ हजार ८१६ रूपये किंमतीचा मुद्देमाला अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघड झाले. शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ तोताराम पाटील (वय-५७) रा. अट्रावल ता. यावल यांनी यावल पोलीसांना माहिती दिली. यावल पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण करीत आहे. 

Protected Content