फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । येथून जवळ आसलेल्या भालोद येथे ४० हजार रूपये किंमतीचे रोटावेटर मशीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, जगदीश भास्कर कुंभार (वय-३४) रा. कृष्ण नगर, भालोदा ता. यावल हे शेती काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे शेतीच्या कामासाठी ट्रक्टर असून रोटावेटर त्यांनी गावातील न्यू इंग्लिश स्कुल शाळेच्या आवारात त्यांनी लावले होते. २३ जुलै रोजी रात्री १० ते २४ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार सकाळी लक्षात आल्यानंतर जगदीश कुंभार यांनी फैजपूर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण चाटे करीत आहे.