जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मनियार मैदाना पार्किंगला लावलेली तवेरा कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी २० नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, शेख अल्ताफ शेख भुरू रा. खंडवा मध्यप्रदेश हा तरूण त्यांच्या तवेरा कार क्रमांक (एमपी ०९ बीडी ५८८०) ने जळगाव शहरातील मनियार मैदानजवळ कामानिमित्त सोमवारी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी आलेला होता. त्यावेळी त्याने त्याची कार ही मनियार मैदानात पार्कींगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्कींगला लावलेली कार चोरून नेली. कार चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेख अल्ताफ यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश भावसार करीत आहे.