भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील निसर्ग प्लाझा येथील सेंट्रल बँकेचे एटीएम मशीन जवळील २० हजार रूपये किंमतीची बॅटरीची चोरी झाल्याचे उघडकीला आले. याबाबत बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी दीड वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील निसर्ग प्लाझा येथील सेंट्रल बँकेचे एटीएम मशीन ठिकाणी असलेले २० हजार रूपये किंमतीची बॅटरी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वत्र शोध घेतला परंत बॅटरीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता सेंट्रल बँकेचे शाखा प्रबंधक प्रशांत भरतराव बेहरे यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल जोशी करीत आहे.