Home क्राईम ट्रॅव्हल्स प्रवासात एकाचा नोटबुक मोबाईल टॅबची चोरी

ट्रॅव्हल्स प्रवासात एकाचा नोटबुक मोबाईल टॅबची चोरी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करतांना एकाचा महागडा नोटबुक मोबाईल टॅब अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे सोमवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता आकाशवाणी चौकात उतरल्यावर समोर आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू कचरू कोल्हे (वय-५७) रा. लक्ष्मी नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने ते पुण्याला गेले होते. काम आटोपून रविवारी २७ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजता ते ट्रॅव्हल्स क्रमांक (एमएच १९ सीवाय २३४) ने जळगावला येण्यासाठी बसले. त्यावेळी त्‍यांच्यासोबत नोटबुक मोबाईल टॅब व इतर  सामान सोबत होता. मध्यरात्री प्रवासात असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांचा २५ हजार  रूपये किंमतीचा नोटबुक मोबाईल टॅब चोरून नेला. सोमवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता उतरल्यानंतर टॅब चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ट्रॅव्हल्स थांबवून चौकशील केली परंतू काहीही माहिती मिळाली नाही. अखेर सायंकाळी ७ वाजता त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोहेकॉ वंदना राठोड करीत आहे.


Protected Content

Play sound