Home क्राईम महिलेच्या पर्समधून रोकडसह मोबाईलची चोरी

महिलेच्या पर्समधून रोकडसह मोबाईलची चोरी


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुभाष चौकात असलेल्या आर.सी.बाफना शोरूम समोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या एका महिलेच्या पर्समधून मोबाईल आणि ५ हजारांची रोकड असा एकुण १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरूवारी २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५.३० वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वनिता सुधिर इंगळे वय ४३ रा. जोशी कॉलनी, जळगाव ह्या महिला गुरूवारी २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आर.सी. बाफना शोरूम समोरील रस्त्यावर उभे असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल आणि ५ हजारांची रोकड असा एकुण १० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर सायंकाळी ५.३० त्यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound