जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील निमखेडी शिवारातील बखळ प्लॉटच्या कंपाऊंडमधून पाण्याची मोटारीसह इतर साहित्या चोरीस गेल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, हॉटेल व्यवसायिक तेंजद्ररसिंग अनुपसिंग महिंद्र (वय-६२) रा. निमखेडी शिवार जळगाव यांचे जैन पाईप कंपनीजवळ महाराष्ट्र गोडावून नावने बखळ मोकळ्या जागा आहे. या बखळ जागेत वडाचे झाड, दत्ताचे लहान मंदीर आणि पडकी झोपडी आहे. पडक्या झोपडीत तेंजद्ररसिंग यांचे पाण्याची मोटार, लोखंडी दरवाजा आणि खिडकी यासह आदी सामान ठेवलेले होते. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तेंजद्ररसिंग हे दत्त मंदिराची साफसफाई करण्यासाठी गेले असता त्यांना झोपडीमधील मोटार, दरवाजा आणि खिडकी दिसून आली नाही. कुटुंबियांना सामानाची विचारपुस केली असता त्यांना काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. बखळ जागेतून अज्ञात चोरट्यांनी सामान चोरीस नेल्याचे लक्षात आल्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिंद्र यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशिल पाटील करीत आहे.