Home क्राईम शेतकऱ्याच्या शेडमधून साहित्याची चोरी ; निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल

शेतकऱ्याच्या शेडमधून साहित्याची चोरी ; निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल


रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील विंवरे खुर्द येथील एका शेतकऱ्याच्या घरासमोरील शेडमधून अज्ञातांनी साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल साहेबराव गायकवाड (वय ४३, रा. विंवरे खुर्द, ता. रावेर) हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी आपल्या घरासमोरील पत्र्याच्या शेडखाली गाडीची स्टेपनी आणि ‘BRIDGES TONE’ कंपनीचे टायर लॉकसह ठेवले होते. १९ फेब्रुवारी च्या रात्री ११ वाजेपासून ते २० फेब्रुवारी च्या सकाळी ६ वाजेच्या दरम्यान, कोणातरी अज्ञात चोरट्याने या साहित्यावर डल्ला मारला.

चोरट्यांनी अंदाजे १३ हजार रुपये किमतीची जुनी वापरती स्टेपनी आणि टायर लंपास केले आहेत. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर गायकवाड यांनी परिसरात शोध घेतला, मात्र काहीही हाती लागले नाही. अखेर त्यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound