भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील किन्ही गावात रमेश गिरधर सुरवाडे यांच्या खळ्यातून दोन म्हशी चोरीस गेल्याचे उघडकीला आले आहे. भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, किन्ही (ता. भुसावळ) येथील रमेश सुरवाडे यांच्याकडे 15-20 म्हशी आहेत. ते गावातील गुरांच्या पाणी पिण्याच्या हौदाजवळ आपल्या म्हशी बांधतात. याठिकाणी रात्री कुणीही नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन, खुटेंचा दोर कापून अज्ञान चोरट्यांनी 80 हजार रुपयांच्या दोन म्हशी लंपास केल्या. त्यांनी याबाबत शेजारी खडका, शिवपूर कन्हाळा या गावांमध्ये जाऊन म्हशींचा शोध घेतला मात्र त्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार गणेश राठोड करीत आहे.