जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात बंद असलेले घर फोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातून सोन्या, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, संदीप रमेश पवार वय-४१, रा. देवराम नगर, निमखेडी शिवार, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान 2 जानेवारी ते 3 जानेवारी दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरातून सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना उघडकीला आल्यानंतर संदीप पवार यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत बदर हे करीत आहे.