बांधकाम ठेकेदाराच्या सेंट्रींग कामाच्या लोखंडी प्लेटांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील अक्सा नगरात बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराच्या सेंट्रींग कामाच्या २० हजार ५०० रूपयांच्या किंमतीच्या लोखंडी प्लेटांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शेख अकील शेख कुर्बान वय-३९ रा. अक्सानगर, मेहरूण, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते बांधकाम ठेकेदाराचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे काही सामान अक्सा नगरातील घरासमोर लोखंडी प्लेटा ठेवल्या होत्या. २ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता ते ३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घरासमोर ठेवलेल्या लोखंडी प्लेटांची चोरी करून २० हजार ५०० रूपये किंमतीचे चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेख अकील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताप पठाण करीत आहे

Protected Content