शेळगाव बॅरेज येथून लोखंडी साहित्यांची चोरी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शेळगाव बॅरेज दरवाजा गेट जवळून अज्ञात चोरट्यांनी १० हजार रुपये किमतीचे लोखंडी साहित्य चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. यासंदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शेळगाव बॅरेज दरवाजाजवळ गेटचे काम सुरू आहे. यासाठी लोखंडी साहित्य व लोखंडी प्लेटाचे स्क्राप ठेवण्यात आले आहे. याठिकाणी वेल्डिंगचे काम असल्याने सर्व साहित्य एका ठिकाणी ठेवण्यात आले होते. दरम्यान मंगळवारी २२ फेब्रुवारी ८ आठ वाजेच्या सुमारास या ठिकाणी ठेवलेले लोखंडी साहित्य व लोखंडी प्लेटा असे एकूण २०० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहेत. याबाबत छावा सुरेश छावा सुभाराव वय 35 रा. गुंटुर राज्य आंध्रप्रदेश यांच्या फिर्यादीवरून दुपारी ४ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अलियार खान करीत आहे.

 

 

 

 

Protected Content